Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

पारोळा येथे महायुतीचा मेळावा

पारोळा प्रतिनिधी । येथे महायुतीचे उमेदवार आमदार उन्मेष पाटील यांच्या प्रचारासाठी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले.

पारोळा येथील माजी आमदार चिमणराव पाटील यांच्या निवासस्थानामागे पारोळा तालुका व एरंडोल तालुक्यातील भारतीय जनता पार्टी शिवसेना आरपीआय व मित्र पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी जलसंपदा मंत्री नामदार गिरीश महाजन, माजी आमदार चिमणराव पाटील, जि.प. अध्यक्षा उज्वला मच्छिंद्र पाटील, आमदार किशोर आप्पा पाटील, आमदार तथा महायुतीचे उमेदवार उन्मेश दादा पाटील, विधान परिषद सदस्य चंदुलाल पटेल, माजी आमदार गुरुमुख जगवाणी, एरंडोलचे नगराध्यक्ष रमेश परदेशी,पारोळ्याचे नगराध्यक्ष करण पवार, ज्येष्ठ नेते बाळासाहेब पवार, आरपीआय आठवले गटाचे जिल्हा प्रमुख आनंद खरात, राष्ट्रीय समाज पक्षाचे गणेश जाणे आदी मान्यवरांची उपस्थिती होती.

याप्रसंगी ना. गिरीश महाजन यांनी आपल्या भाषणातून विरोधकांचा जोरदार समाचार घेतला. ते म्हणाले की, उत्तर महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेसचे अस्तित्व संपुष्टात आले आहे.राष्ट्रवादीचे एकमेव शेंडेफळ पारोळ्यात आहे. मी जेथे जातो तेथे प्रामाणिक कार्यकर्त्यांच्या जीवावर विजयश्री खेचून आणतो. त्यामुळे येत्या काळात त्यांना डिपॉझिट वाचवायची वेळ येणार आहे. जळगाव लोकसभा मतदार संघात नगराध्यक्ष करण पवार यांच्या सारख्या कार्यकर्त्यांमुळे युती अधिक भक्कम झाल्याने येत्या आगामी लोकसभा निवडणुकीत उन्मेश दादा पाटील पाच लाख मतांच्या मताधिक्क्याने निवडून येतील असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला. तर आगामी कालखंडात युती अभेद्य राहून येत्या विधानसभेत चिमणराव आबा आमदार निवडून येतील असेही ना. महाजन म्हणाले.

Exit mobile version