Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

जळगाव जनता बँक सभासदांसह समाजाची सेवा करण्यात अग्रेसर – खासदार उन्मेष पाटील

चाळीसगाव प्रतिनिधी । जनता बँकेने गेल्या चाळीस वर्षांपासून सर्वसामान्य माणसाला व सभासदांना आर्थिक मदत करून स्वतःच्या पायावर उभे करण्याचे काम केले आहे. अतिशय सचोटीने आपला व्यवहार पारदर्शक ठेवत राज्यात एक आदर्श सहकारी बँक म्हणून नावलौकिक मिळविला आहे. येत्या काळात बँकेच्या भरभराटीसाठी मला जे-जे करता येईल त्यासाठी नेहमी अग्रेसर राहील, अशी ग्वाही जळगाव लोकसभा मतदार संघाचे खासदार उन्मेष पाटील यांनी आज येथे व्यक्त केले आहे.

रविवारी जळगाव जनता सहकारी बँकेच्या ४१ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत नवनिर्वाचित खासदार उन्मेष पाटील यांच्या सत्कार करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी बँकेचे अध्यक्ष तथा सीए प्रा. डॉ. अनिल राव यांनी त्यांचा शाल श्रीफळ व स्मृति चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. आमदार उम्मेश पाटील यांनी बोलतांना पुढे सांगितले की, विद्यमान संचालक पदाधिकारी कर्मचारी यांनी सेवा त्याग मूर्ती स्व. अविनाशदादा आचार्य यांच्या विचाराचा वारसा समर्थपणे सांभाळली आणि पुढे नेली आहे. जनता बँक परिवाराचे मला सदैव आशीर्वाद मिळाले आहेत. तर खासदार उन्मेष पाटील यांच्या सत्कार प्रसंगी अनिल राव यांनी उन्मेष पाटील यांच्या एम जे कॉलेजमध्ये शिक्षण घेत असतानाच्या काही प्रसंग सांगितले. ते म्हणाले की एम जे महाविद्यालयात झालेल्या विद्यार्थ्यांच्या युवा संसद कार्यक्रमात दाखविलेली राजकीय महत्वाकांक्षेंची चुणूक त्यावेळी खासदार वाय जी महाजन यांनी बघितली आणि उन्मेष पाटील एक दिवस खान्देश च्या राजकीय पटलावर आपले नाव झळकवतील असे भाकीत व्यक्त केले होते.त्याची मला आज प्रकर्षाने आठवण झाली अशी भावना बँकेचे अध्यक्ष अनिल राव यांनी व्यक्त केली.

कार्यक्रमास यांची होती उपस्थिती
यावेळी बँकेचे उपाध्यक्ष डॉ.प्रताप जाधव, जयेश दोशी, बन्सीलाल अंदोरे, सतीश मदाने, दिपक अट्रा वलकर, रवींद्र बेल पाठक ,जयंतीलाल सुराणा, सुभाष लोहार, सुरेश केशवाणी, विवेक पाटील, डॉ.अतुल सरोदे, हरिश्चंद्र यादव, कृष्णा कामठे, डॉ. आरती हुजुरबाझार, सावित्री साळुंखे, विनायक गोविलकर, ओंकार पाटील, हेमंत चंदनकर, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पुंडलिक पाटील यांच्यासह बँकेचे अधिकारी पदाधिकारी कर्मचारी व हजारो सभासद उपस्थित होते. डॉ. अतुल सरोदे यांनी सूत्रसंचालन केले.

Exit mobile version