Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

बोरावल येथे अविवाहीत तरुणाची आत्महत्या

यावल प्रतिनिधी । तालुक्यातील मोठे बोरावल येथे एका अविवाहीत तरूणाने शेतात गळफास घेवुन आत्महत्या केल्याची घटना घडली असुन याबाबत पोलीसात अक्समात मृत्युनोंद करण्यात आली आहे. 

या संदर्भात पोलिस सुत्रांकडुन मिळालेली माहीती अशी की मोठे बोरावल येथील राहणारे संजय अशोक सपकाळे (वय ३२ वर्ष) यांनी दिनांक ९ डिसेंबर ते १० डिसेंबरच्या सकाळी ८वाजेच्या दरम्यान बोरावल शिवारातील निलेश निवृत्ती कोळी यांच्या शेतातील निंबाच्या झाडावर गळफास घेवुन आत्महत्या केल्याची घटना घडली.

या संदर्भात यावल पोलीस स्टेशनला मयताचा चुलत भाऊ भास्कर रमेश कोळी यांनी खबर दिल्याने अक्समात मृत्युची नोंद करण्यात आली असुन घटनेचा तपास पोलीस निरिक्षक सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हॅड कॉस्टेबल अशोक जवरे हे करीत आहे . दरम्यान आत्महत्या केलेल्या संजय सपकाळे यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन ग्रामीण रुग्णालयाचे वैधकीय अधिकारी डॉ.बी.बी.बारेला यांनी केले.

Exit mobile version