Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

दुदैवी ! वीज कोसळल्याने तरूणाचा जागीच मृत्यू

सावदा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । सरपण घेण्यासाठी जंगलात गेलेल्या तरूणाचा अंगावर वीज कोसळल्याने जागीच मृत्यू झाल्याची दुदैवी घटना घडली आहे. याबाबत सावदा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

 

याबाबत अधिक माहिती अशी की, मुकद्दर कलींदर तडवी (वय-२१) रा. जानोरी ता. रावेर हा तरूण आपल्या आईसह वास्तव्याला आहे. मजूरीचे काम करून आपला उदरनिर्वाह करत होते. २३ जून रोजी दुपारी १२ वोच्या सुमारास मुकद्दर तडवी हो सरपण घेण्यासाठी जानोरा गावापासून जवळ असलेल्या जंगलात गेला होता. दरम्यान, दुपारी वादळी पावसाने जोरदार हजेरी लावली होती. मुकद्दर तडवी हा घरी न आल्याने त्याला शोधण्यासाठी गावातील काही तरूण गेले होते. दरम्यान एका टेकडीच्या पायथ्याशी मुक्कदर तडवी बसलेला दिसून आला. दुपारी ३ वाजेच्या सुमारास अचानक आकाशातून विज मुकद्दरच्या अंगावर कोसळली व त्याचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी सावदा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मयता मुकद्दरच्या पश्चात आई गहिनाबाई या आहेत.

 

Exit mobile version