Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

अनलॉक ४ जाहीर : धार्मिक व राजकीय कार्यक्रमांना परवानगी; शाळा मात्र बंद

नवी दिल्ली । केंद्र सरकारने अनलॉक ४ जाहीर केला असून यात सप्टेंबरच्या उत्तरार्धापासून धार्मिक व राजकीय कार्यक्रमांना परवानगी देण्यात आली आहे. तर शाळा कॉलेज मात्र बंदच राहणार असल्याचेही स्पष्ट झाले आहे.

३१ ऑगस्ट रोजी संपणार्‍या अनलॉक ३ चा पुढील टप्पा केंद्र सरकारने जाहीर केला आहे. अनलॉक ३ टप्पा ३१ ऑगस्ट रोजी संपत आहेत. त्यामुळे केंद्रीय गृहमंत्रालयानं अनलॉक ४ जाहीर केला आहे. अनलॉक ४मध्ये सास्कृतिक, धार्मिक, राजकीय कार्यक्रमांना परवानगी देण्यात आली आहे. तर शाळा महाविद्यालये सप्टेंबर अखेरपर्यंत बंदच राहणार आहे. यासाठी सरकारनं मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत.

केंद्रीय गृह मंत्रालयाने जाहीर केल्यानुसार २१ सप्टेंबर पासून राजकीय, क्रीडा, सांस्कृतीक आणि धार्मिक कार्यक्रमांना परवानगी देण्यात आली आहे. यात १०० लोकांपेक्षा जास्त नसावेत असे मात्र नमूद करण्यात आले आहे. तर येत्या 7 सप्टेंबरपासून दिल्ली मेट्रोसेवा सुरु होणार असून आंतरराज्य आणि राज्यांतर्गत व्यक्ती आणि माल वाहतुकीला सूट देण्यात आली आहे. म्हणजेच देशात कुठेही मुक्त संचार करता येणार आहे. यासाठी कोणत्याही प्रकारची परवानगी, ई परमीट, ईपासची गरज राहणार नसल्याचे गृह मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.

दरम्यान, अनलॉक ४ मध्येही शैक्षणिक संस्था आणि खासगी कोचींग क्लासेसला परवानगी नाकारण्यात आलेली आहे. यामुळे ३० सप्टेंबर पर्यंत तरी शाळा वा कॉलेज सुरू होणार नसल्याचे आता स्पष्ट झाले आहे. सिनेमा हॉल, जलतरण तलाव, आंतरराष्ट्रीय उड्डाणे (काही विशिष्ट सोडून) अजूनही बंद राहणार आहे.

Exit mobile version