Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

चाळीसगावात अज्ञाताने लांबविला मोबाईल ; गुन्हा दाखल

चाळीसगाव प्रतिनिधी । शहरातील बस स्थानकावर झोपलेल्या एका ३२ वर्षीय व्यक्तीच्या खिश्यातून अज्ञाताने साडे बारा हजार रुपये किंमतीचा मोबाईल लांबविल्याची घटना उघडकीस आली असून याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आले आहे.

याबाबत वृत्त असे की, विजय देविदास जाधव (वय-३२) रा. हारसवाडी ता. कन्नड जि. औरंगाबाद हे वरील ठिकाणी वास्तव्यास आहेत. दरम्यान खासगी कामानिमित्त ते २३ सप्टेंबर रोजी चाळीसगाव शहरात आलेले असताना त्यांना बसस्थानकावर झोप लागली. याचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी त्याच्या उजव्या खिश्यात ठेवलेला १२,५०० रूपये किंमतीचा ओपो ए-३१ कंपनीचा मोबाईल चोरून नेल्याची घटना उघडकीला आली आहे. त्यावर त्यांनी परिसरात शोधाशोध केली परंतु मोबाईल मिळून आला नाही. म्हणून कोणीतरी अज्ञात इसमाने मोबाईल चोरून नेल्याचे स्पष्ट झाल्याने चाळीसगाव शहर पोलिस स्थानक गाठून भादवी कलम-३७९ प्रमाणे अज्ञात इसमाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आले आहे. पोलिस निरीक्षक के. के. पाटील यांच्या निर्देशानुसार पुढील तपास सुरू आहेत.

 

 

Exit mobile version