Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

हिवरखेडा परीसरात अनोळखी व्यक्तीचा मृतदेह

dead body hiverkhed

जामनेर प्रतिनिधी । तालुक्यातील हिवरखेडा परिसरात एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळला असून याची ओळख पटविण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

अंदाजे वय ३० वर्ष वय असणारा इसम हा मयत स्थितीत शनिवारी सायंकाळी हिवरखेडा शिवारातील शेत गट न १६६/२ च्या बांधावर आढळून आला आहे. त्याच्या अंगात पांढरा व आकाशी चौकडीचा शर्ट ,राखाडी रंगाची पँट, उजव्या हातावर जय भैरवी नाव गोंदलेले, एक फुलपाखराचे चित्र गोंदलेले अशा वर्णनाचा इसम मयत स्थितीत मिळुन आला आहे. या व्यक्तीची ओळख पटविण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. या संदर्भातील माहितीसाठी पोलीस उपनिरीक्षक कदम तसेच जामनेर पोलीस स्टेशन ०२५८०/२३००३३ येथे संपर्क साधावा

Exit mobile version