Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

रावेरात दिव्यांग बांधवांचे अनोखे आंदोलन

रावेर प्रतिनिधी । रावेर येथील पुरवठा निरीक्षकांच्या बंद कार्यालयाला हार घालून दिव्यांग बांधवांनी गांधीगरी करत अनोखे आंदोलन केले आहे. किरकोळ कामांसाठी दिव्यांग बांधवांना फिरविले जात असल्याचे दिव्यांग बांधवांनी सांगितले.

याबाबत माहिती अशी की,  दिव्यांग बांधवांनी रावेर तहसीलमध्ये पुरवठा निरिक्षक अतुल नागरगोजे यांच्या कुलुप बंद कार्यालयाला हार टाकून गांधीगिरी पध्दतीने आंदोलन करण्यात आले. पुरवठा निरिक्षक दिव्यांग बांधवांची फिरवा-फिरव करतात, त्यांना रेशन कार्ड देण्यासाठी अडवणुक करत असल्याने तालुभरातील दिव्यांग बांधवांची भटकंती होत असून अपमास्पद बोलत असल्याचा आरोप उपस्थित दिव्यांग बांधवांनी केला. यावेळी भारतीय जनता पार्टी दिव्यांग आघाडी तालुकाध्यक्ष रजनीकांत बारी, शहराध्यक्ष महेश महाजन, ब्रिजलाल पाटील, पवन शिरनामे, प्रदीप परदेशी आदी दिव्यांग बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Exit mobile version