Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

गणपती-निर्माल्य संकलनासाठी सतपंथ चॅरिटेबल ट्रस्टचा अनोखा उपक्रम

फैजपूर ता. यावल (प्रतिनिधी) । यावर्षी कोरोना महामारीच्या संकटामुळे शासनाने गणपती मिरवणुकीसह सामूहिक विसर्जनासाठी निर्बंध घातले आहे. विसर्जन स्थळी गर्दी होऊन भाविकांचे हाल तसेच मूर्तीं विसर्जनानंतर विटंबना होऊ नये म्हणून सतपंथ चॅरिटेबल ट्रस्ट व फैजपुर पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त विद्यमाने महत्वपूर्ण उपक्रम हाती घेण्यात आला आहे.

गणपती विसर्जनाच्या दिवशी फैजपूर शहरातील प्रत्येक भागात संकलन केंद्र स्थापन करून या ठिकाणी परिसरातील नागरिकांनी विधिवत पूजा करून गणपती व निर्माल्य कार्यकर्त्यांकडे सुपूर्द करायचे आहे. नेमून दिलेले स्वयंसेवक व कार्यकर्ते यांच्या मार्फत बाप्पाची आरती करून विधिवत पणे गणपती विसर्जन करण्यात येणार आहे. संकलित निर्माल्याचे सेंद्रिय खत तयार करण्यात येणार आहे.

फैजपूर शहरात अनुक्रमे विद्यानगर, गुरुदत्त नगर, पांडुरंग नगर, श्रीकृष्ण नगर साठी- जेष्ठ नागरिक हॉल, शिवाजीनगर, आसाराम नगर, आराधना कॉलनी, सानेगुरुजी नगर, सराफ कॉलनी, आणि जानकी नगर यासाठी- नीलकंठेश्वर महादेव मंदिर, हनुमान नगर, लक्ष्मी नगर, आशिष सराफ नगर, करिता -शुभ दिव्य लॉन, नाथ वाडा, तूप बाजार, वायकोळे वाडा, न्हावी दरवाजा, ब्राह्मण गल्ली, आणि दत्तगल्ली यासाठी जुने हायस्कूल तर बोरोले वाडा, लक्कड पेठ, होले वाडा, कासार गल्ली, धोबी वाडा यासाठी लक्कड पेठ बैठक, देवीवाडा, त्रिवेणी वाडा, परदेशी वाडा, पेहेड वाडा, भारंबे वाडा, कोल्हेवाडा, खुशाल भाऊ रोड याकरिता साईबाबा मंदिर जवळील हॉल, तर टाकी वाडा, रंगार घाटी, भारंबे वाडा, किरंगे वाडा यासाठी टाकी वाडा तर उपासना कॉलनीमध्ये शिवा नेहते यांचे घर अशी ठिकाणे संकलन केंद्र म्हणून निश्चित करण्यात आलेली आहे. नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन सतपंथ चॅरीटेबल ट्रस्टचे अध्यक्ष महामंडलेश्‍वर जनार्दन हरीजी महाराज व फैजपूर पोलीस स्टेशनचे एपीआय प्रकाश वानखडे यांनी केले आहे.

Exit mobile version