Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांच्या कारला अपघात; पत्नी ठार

बंगळुरू वृत्तसंस्था । केंद्रीय आयुष मंत्री श्रीपाद नाईक यांच्या गाडीला भीषण अपघात झाला असून यात त्यांची पत्नी जागीच ठार झाली असून ते स्वत: जखमी झाले आहेत.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, श्रीपाद नाईक यांच्या कारला अपघात झाला असून, नाईक यांना गंभीर दुखापत झालीय, तसेच त्यांच्या पत्नी विजया नाईक यांचा मृत्यू झाला आहे. कर्नाटकातील उत्तरा कन्नड जिल्ह्यातील येल्लापुरा येथे त्यांची गाडी पलटी झाली. 

श्रीपाद नाईक यांच्या कारच्या चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर आलेली आहे. नाईक हे उत्तर गोवा लोकसभा मतदार संघातून निवडून आले असून ते मातब्बर नेते म्हणून ओळखले जातात. त्यांच्या कारला अपघात झाल्याची माहिती मिळताच कर्नाटक सरकारने तातडीने घटनास्थळी मदत केली असून प्रशासकीय यंत्रणांनी नाईक यांना खासगी रूग्णालयात दाखल केले आहे.

 

Exit mobile version