Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

धावत्या रेल्वेच्या धक्क्याने अनोळखी तरूणाचा मृत्यू; अकस्मात मृत्यूची नोंद

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । चाळीसगाव तालुक्यातील हिरापूर रेल्वे स्टेशनजवळ धावत्या रेल्वेचा धक्का लागल्याने अंदाजे ४० वर्षीय अनोळखी तरूणाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली. याप्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

याबाबत चाळीसगाव ग्रामीण पोलीसांनी दिलेली माहिती अशी की, चाळीसगाव तालुक्यातील हिरापूर रेल्वेस्टेशन जवळील डाऊन रेल्वे लाईनवरील रेल्वे खंबा क्रमांक ३०९ च्या ३ जवळ धावत्या रेल्वेचा धक्का लागल्याने एका अंदाजे ४० वर्षीय अनोळखी तरूणाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना सोमवारी १५ एप्रिल रोजी दुपारी २ वाजता घडली. या घटनेची माहिती रेल्वेगाडीचे लोको पायलट एस. साळुंखे यांनी चाळीसगाव ग्रामीण पोलीसांना दिली. घटनेची माहिती मिळाल्याने पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून मृतदेह चाळीसगाव ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आला. याप्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास सपोनि दिलीप रोकडे हे करीत आहे.

Exit mobile version