Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

नवीपेठेतून मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी लांबविली तरूणाची दुचाकी

जळगाव प्रतिनिधी । शहरातील नवीपेठेतून तरूणाच्या राहत्या घरसमोरून अज्ञात चोरट्यांनी ४० हजार रूपये किंमतीची दुचाकी लांबविल्याची घटना शुक्रवारी उघडकीला आली. याप्रकरणी रात्री उशीरा शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अधिक माहिती अशी की, सचिन अनिल अडावदकर (वय-२५) रा. हॉटेल साई सागर जवळ नवीपेठ हा खासगी काम करून उदरनिर्वाह करतो. त्यांच्याकडे  (एमएच १९ डीडी ३५१२)  क्रमांकाची दुचाकी आहे.  कामासाठी ते दुचाकीवर वापर करतात. नेहमीप्रमाणे १८ फेब्रुवारी रोजी रात्री ९ वाजता कामावरून घरी आले. दुचाकी () हॉटेल साई सागर समोरील मोकळ्या जागेवर पार्कींग करून लावली. दरम्यान मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी दारासमोर लावलेली दुचाकी लांबविल्याचा प्रकार शुक्रवार रोजी उघडकीला आला. परिसरात दुचाकीचा शोध घेवून मिळाली नाही. याप्रकरणी सचिन अडावदकर यांच्या फिर्यादीवरून शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाई राजकुमार चव्हाण करीत आहे.

 

Exit mobile version