Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

चाळीसगाव शहरातून अज्ञात चोरट्यांनी लांबवली दुचाकी

चाळीसगाव प्रतिनिधी । मित्राच्या बहिणीच्या लग्नात गेलेल्या व्यक्तीची एका अज्ञात चोरट्यांनी दुचाकी लंपास केल्याची घटना शहरातील भडगाव रोडवरील पाटादार भवन मंगल कार्यालय येथे घडल्याची उघडकीस आली आहे. याप्रकरणी फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

याबाबत सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, किरण शंकर चौधरी (वय-३० रा. नेताजीपालकर चौक, कामगार भवन समोर, चाळीसगाव) हा व्यवसायाने फोटोग्राफर आहे. मित्राच्या बहिणीच्या लग्नासाठी तो भडगाव रोडवरील पाटादार भवन मंगलकार्यालय येथे ३ फेब्रुवारी रोजी दुपारी २:४५ वाजता गेला असता. परतल्यावर मुळ ठिकाणी आपली मोटारसायकल (गाडी क्र. MH 19 CC-1682)नसल्याचे लक्षात आले. त्यांनी खूप शोधाशोध केली. मात्र मोटारसायकल आढळून आली नाही. किरण चौधरी यांनी याबाबत शहर पोलिस ठाण्यात आज फिर्याद दाखल केली. शहर पोलिस निरीक्षक विजयकुमार ठाकूरवाड यांच्या निर्देशानुसार पुढील तपास शैलेंद्र पाटील हे करीत आहेत.

Exit mobile version