Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

पाचोऱ्यात चोरट्यांनी व्यापाऱ्याचे घर फोडले

पाचोरा प्रतिनीधी । शहरातील यशोदा नगर भागात आज दुपारी अज्ञात चोरट्याने विनोद बोथरा यांच्या घराच्या लाकडी दाराचे कुलूप तोडले आणि सोन्या-चांदीचे दागिने आणि रोकड  १ लाख ७४ हजार रुपये चोरले. शहरातील नवनियुक्त उपविभागीय पोलिस अधिकारी भरत काकडे यांना चोरट्यांनी मोठे आवाहन केले आहे.

शहरातील  विनोद दिपचंद बोथरा रा. यशोदानगर, पाचोरा  यांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीवरून त्यांची पत्नी कल्पाना, दिपचंद बोथरा (वडील), दिवेश (मुलगा),  मंजुशा (मुलगी), ताराबाई (आई) असे आम्ही घरातील सर्व जण कासमपुरा येथे गुरू महाराजाचे दर्शन घेण्यासाठी आमच्या खाजगी वाहनाने गेलो होतो. दरम्यान पाचोरा येथे आलो असता मी आमच्या वर्धमान  कापड दुकानाजवळ खाली उतरून कापड दुकानावर व्यावसायासाठी थांबलो व मुलगा, वडील, पत्नी मुलगी असे घरी आले तेव्हा त्यांना घराच्या दरवाज्याला लावलेले कुलुप दरवाज्यास नव्हते व समोरील दरवाजा उघडा दिसला तेव्हा मुलगा दिवेश यांने सदरचा दरवाजा ढकलुन उघडला.

तेव्हा घरामधील सामान अस्ताव्यस्त पडलेला दिसला लागलीच मुलगा दिवेश याने मला फोन वर कळविल्याने मी दुकानावरून घरी आलो मी मुलगा अशानी घरातील देवधरातील असलेले कपाटाचे लॉकर तुटुन सामान बाहेर पडलेला दिसला आम्ही कपाटाजवळ जावुन लॉकर मध्ये एका अँल्यमिनीयम च्या पेटी मध्ये आईचे ठेवलेलेसोन्या चांदीचे दागिने व रोख रूपये सदर लॉकर मध्ये आम्हाला दिसले नाही त्यावर आमची खात्री झाली की घरात चोरी झाली आहे सदर चोरीत १ लाख ५० हजार रूपये किंमतीची ३.७५ तोळे वजनाची सोन्याची मंगळपोत, ५ हजार रूपये किंमतीचे ३ जोड चांदिचे पैजण २० हजार रुपये, रोख ५०० रुपये दराच्या ४० नोटा असे एकुण – १ लाख ७५ हजार रुपये अज्ञात चोरट्याने चोरून नेले आहे.सदर प्रकरणी पाचोरा पोलिसात गुन्हा नोंदविण्यात आला असुन पुढील तपास सहाय्यक पोलिस निरिक्षक राहुल मोरे हे करित आहे. या घटने नंतर परिसरात खळबळ उडाली असुन पोलिसांनापुढे अज्ञात चोरट्यांनी मोठे आवाहन उभे केले आहे.

Exit mobile version