Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

अवैध साग वाहतूक करणारा अज्ञात व्यक्ती पसार; वनरक्षकांची कार्यवाही

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | ४ जानेवारी रोजी लासूर चौगाव गाळ रस्त्यावर रात्री गस्त करीत असता, पहाटे ५:०० वाजेच्या सुमारास अज्ञात  इसम  मोटारसायकलवर  साग नग वाहतूक करताना दिसून आला, त्याचा पाठलाग करून पकडण्याचा प्रयत्न केला असता, सदर इसम मुद्देमालासह  मोटारसायकल जागे वर टाकून अंधाराचा फायदा घेत पसार झाला. सदर नगांचे मोजमाप घेतले असता, साग नग-16 घ.मी. -0.208 माल किंमत-6,656/-इतकी आहे.व 1 मोटारसायकल अंदाजीत किंमत -10,000/-असून सदर मुद्देमाल शासकीय वाहनाने मूख्य विक्री केंद्र,चोपडा येथे जमा केला.सदर गुन्ह्याबाबत वनपाल लासूर यांनी  1/2024 दि.04/01/2024 चा जारी केला असे.

सदरची कार्यवाही जमीर शेख सो.उपवनसंरक्षक यावल, प्रथमेश हाडपे सो, साहायक वनसंरक्षक चोपडा व समाधान सोनवणे सो, वनपरिक्षेत्र अधिकारी चोपडा यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशांत सोनवणे वनपाल लासूर, वनरक्षक शुभम पाटील, अमोल पाटील, संदीप पावरा, वाहनचालक गोविंदा चौधरी यांनी केली.

Exit mobile version