Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

अनोळखी वृध्दाचा जिल्हा रूग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील नवीन बसस्थानक अत्यवस्थ अवस्थेत आढळून आलेल्या अनोळखी वृध्दाचा जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू असतांना शनिवारी २७ मे रोजी दुपारी अडीच वाजता मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

जळगाव शहरातील नवीन बसस्थानक परिसरात अंदाजे ६५ वर्षीय वृध्द व्यक्ती अत्यवस्थ अवस्थेत शुक्रवारी २६ मे रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास आढळून आले होते. शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक भरत सुर्यवंशी यांनी तातडीने खासगी वाहनातून जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. दरम्यान, त्यांच्यावर उपचार सुरू असतांना शनिवारी २७ मे रोजी दुपारी अडीच वाजता अनोळखी वृध्दाचा मृत्यू झाला. वैद्यकीय अधिकारी डॉ. सचिन पाटील यांनी दिलेल्या खबरीवरून जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोहेकॉ महेंद्र पाटील करीत आहे.

Exit mobile version