Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

दुदैवी घटना : झोक्यावरून पडल्याने सेवानिवृत्त सैनिकाचा मृत्यू

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । वाघ नगर येथे राहत्या घरात झोक्यावर बसलेले असतांना तोल जावून खाली पडल्याने सेवानिवृत्त सैनिक यांचा दुदैवी मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी रात्री घडली आहे. याप्रकरणी रात्री उशीरात जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. चंद्रशेखर सखाराम काळे (४०, रा. वाघ नगर) असे मयत झालेले सेवानिवृत्त सैनिकाचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, सैन्य दलातून निवृत्त झालेले चंद्रशेखर काळे हे सध्या वाघ नगरमध्ये श्री दत्त मंदिरामागे राहत होते. मंगळवार २७ फेब्रुवारी रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास घरी असताना झोक्यावर बसलेले होते. त्यावेळी त्यांचा अचानक तोल गेला व ते खाली पडले. त्यात त्यांच्या डोक्याला जबर मार लागला. त्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी मयत घोषित केले. त्या वेळी नातेवाईकांनी आक्रोश केला. याप्रकरणी रात्री उशीरा जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. काळे यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे.

Exit mobile version