Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

दुदैवी घटना : झोपेत सर्पदंश झाल्याने शाळकरी मुलीचा करूण अंत !

सांगली-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । रात्री झोपेत असतांना सर्पदंश झाल्याने १५ वर्षीय शाळकरी मुलीचा करूण अंत झाल्याची दुदैवी घटना समोर आली आहे. श्रेया श्रीशैली न्हावी (वय-१५) रा. संख ता. जत जि.सांगली.  असे मयत शाळकरी मुलीचे नाव आहे. नातेवाईकांनी तातडीने जत ग्रामीण रूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी मयत घोषीत केले.

सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील संख गावामध्ये अवघ्या १५ वर्षीय शाळकरी मुलीचा सर्पदंशाने करुण अंत झाल्याची धक्कादायक घटना घडली. श्रेया श्रीशैल न्हावी (वय 15) ही नेहमीप्रमाणे शनिवारी ९ ऑक्टोबर रोजी रात्री झोपली असता सर्पदंश केल्यानंर श्रेया ओरडून जागी झाली. त्यानंतर नातेवाइकांनी रात्री दहा वाजता जत ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. डॉक्टरांनी श्रेयाचा मृत्यू झाल्याचे घोषित केले.  तिच्या निधनाचे वृत्त समजताच नातेवाइकांनी हंबरडा फोडला. रविवारी सकाळी सात वाजेच्या सुमारास ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. या घटनेची नोंद जत पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Exit mobile version