Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

वीजेचा धक्का लागल्याने प्रौढाचा दुदैवी मृत्यू

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । कुलर चालू करण्यासाठी गेलेल्या प्रौढाचा विजेचा धक्का लागल्याने जागीच मृत्यू झाल्याची दुदैवी घटना यावल शहरात घडली आहे. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मिलींद आंबादास गजरे, वय ५५ रा. पंचशिल नगर, यावल असे मृत झालेल्या प्रौढाचे नाव आह.े

याबाबत अधिक असे की, मिलींद गजरे हे आपल्या परिवारासह वास्तव्याला होते. आपल्या राहत्या घरात कुलर सुरू असतांना बटन बंद करण्याच्या प्रयत्नात असतांना अचानक अंगावर कुलर पडल्याने त्यांना वीजेचा जोरदार धक्का बसला. त्यातच ते ते बेशुध्द पडले, त्यांना तातडीने खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर पुढील उपचारासाठी यावल ग्रामीण रूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी मयत घोषीत केले. या संदर्भात यावल पोलीस ठाण्यात शालु मिलींद गजरे यांनी खबर दिल्याने अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस निरिक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली स. फौ. विजय पाचपोळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस तपास करीत आहे.

Exit mobile version