Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

धावत्या रेल्वेचा धक्का लागल्याने प्रौढाचा दुदैवी मृत्यू

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील सावखेडा रेल्वेपुलाजवळ एका अनोळखी पुरूषाचा धावत्या रेल्वेचा धक्का लागल्याने जागीच मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी ३१ ऑक्टोबर रोजी सकाळी ७ वाजेच्या सुमारास उघडकीला आला आहे. याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नेांद करण्यात आली आहे.

पोलीस सुत्रांनी दिलेली माहिती अशी की, जळगाव ते शिरसोली दरम्यान गिरणा पंपिंग रस्त्यावरील सावखेडा पुलाजवळ खांबा क्रमांक ४१५/०८ जवळ रेल्वेच्या धडकेत एक जण ठार झाल्याची माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी मंगळवारी ३१ ऑक्टोबर रोजी सकाळी ७ वाजेच्या सुमारास जळगाव तालुका पोलिसांना दिली. त्या वेळी पोहेकॉ लीलाधर महाजन व त्यांचे सहकारी घटनास्थळी पोहचले. तेथे एक अंदाजे अनोळखी ४२ वर्षीय प्रौढ व्यक्ती मृतावस्थेत आढळून आला. त्याची ओळख पटविण्याचा प्रयत्न केला. मात्र ओळख पटू शकली नाही.

मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नेण्यात आला. या प्रकरणी जळगाव तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Exit mobile version