Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

धावत्या रेल्वेचा धक्का लागल्याने तरूणाचा दुदैवी मृत्यू

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील सत्यम पार्कजवळील रेल्वे मालधक्क्याजवळ धावत्या रेल्वेचा धक्का लागल्याने २४ वर्षीय तरूणाचा दुदैवी मृत्यू झाल्याची घटना रविवारी १० डिसेंबर रोजी सकाळी ८.३० वाजेच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. विजय नवल पवार वय-२४ रा. सत्यम पार्क, जळगाव असे मृत तरूणाचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव शहरातील सत्यमपार्क परिसरात विजय पवार हा तरूण आई वडी आणि दोन भाऊ यांच्यासोबत वास्तव्याला आहे. बांधकामाच्या स्टाईलचे काम करून आपला उदरनिर्वाह करत होता. नेहमीप्रमाणे विजय पवार हा रविवारी १० डिसेंबर रोजी सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास शौचालयासाठी जवळच्या रेल्वे मालधक्काजवळील रेल्वेरूळाजवळ गेला. त्यावेळी डाऊन रेल्वे लाईनवरील रेल्वे खंबा क्रमांक ३०३ च्या ३६ स्पॉट जवळ त्याला एका धावत्या रेल्वेचा जोरदार धक्का लागला. या अपघात त्याचा जागीच मृत्यू झाला. ही घटनेची माहिती मिळाल्यानंतर जळगाव तालुका पोलीसांनी घटनास्थळी धाव घेवून मृतदेहाचा पंचनामा केला. मृतदेह तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आला. याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. पुढील तपास पोहेकॉ अनिल फेगडे करीत आहे.

Exit mobile version