Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

कन्नड घाटात बेवारस मृतदेह आढळला

चाळीसगाव- लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | येथील कन्नड घाटाच्या मेन बत्तीजवळील खोलदरीत एका ४२ वर्षीय अनोळखी इसमाचा मृतदेह आढळून आला आहे. याप्रकरणी ग्रामीण पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

याबाबत सविस्तर वृत्त, चाळीसगाव – कन्नड दरम्यान असलेल्या कन्नड घाटातील मेन बत्तीजवळील पंधरा फूट खोल दरीत एका ४२ वर्षीय अनोळखी इसमाचा मृतदेह बुधवार, २५ रोजी १:३० वाजता (वेळ निश्चित नाही) आढळून आला आहे. सदर घटनेची माहिती मिळताच ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. व मृतदेहाला शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु सदर इसमाची ओळख अद्याप पटलेली नाही. पोलिस याचे तपास करीत आहे. तत्पूर्वी मयताचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून वैद्यकीय अधिकारी यांच्या खबरीवरून चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्थानकात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या निर्देशानुसार पुढील तपास सपोनि हर्षा जाधव हे करीत आहे.

Exit mobile version