Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

भुसावळचा युनानी काढा तुफान लोकप्रिय; आता विदेशातून मागणी ( व्हिडीओ )

भुसावळ संतोष शेलोडे । कोरोनाच्या प्रतिकारासाठी रोग प्रतिकारकता वाढविणार्‍या काढ्याची निर्मिती येथील भाजपचे गटनेते हाजी मुन्ना इब्राहीम तेली यांनी केली आहे. तज्ज्ञ डॉक्टर्सच्या देखरेखीखाली तयार करण्यात आलेल्या या युनानी काढ्याला महाराष्ट्र, मध्यप्रदेश व गुजरातमध्ये लोकप्रियता लाभली आहे. तर आता बांगलादेश व कतार मधूनही याला मागणी आली आहे.

कोरोनापासून बरे होण्यासाठी अद्याप कोणतीही औषधी अस्तित्वात आलेली नाही. तथापि, रोग प्रतिकारक शक्ती वाढविणार्‍या काढ्यांचा यासाठी चांगला उपयोग होत असल्याचे दिसून येत आहे. यात मालेगाव येथील कोरोनाचा संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी युनानी काढ्याचा चांगला उपयोग झाल्याचे सिध्द झाले आहे. यामुळे कधी काळी कोरोनाचा हॉटस्पॉट ठरेल्या मालेगावात याचा संसर्ग पुर्णपणे आटोक्यात आलेला आहे. यामुळे आता सर्वत्र मालेगावचा काढा लोकप्रिय झाला आहे. या पार्श्‍वभूमिवर, भुसावळ येथील पालिकेतील भाजपचे गटनेते तथा ख्यातनाम व्यावसायिक व सामाजिक कार्यकर्ते हाजी मुन्ना इब्राहीम तेली यांनी मालेगावातील तज्ज्ञ डॉक्टर्सच्या मदतीने काढा तयार केला असून याला ना नफा-ना तोटा या तत्वावर सर्वसामान्यांसाठी उपलब्ध करून दिले आहे.

या काढ्यात नऊ आयुर्वेदीक जडीबुटींचा समावेश आहे. यातील पाच औषधी भारतातील तर चार विदेशातील आहेत. या सर्वांना योग्य प्रमाणात एकत्र करून याला बारीक दळण्यात येते. यानंतर याला पॅकींग करून बाजारपेठेत उपलब्ध करण्यात आले आहे. सध्या महाराष्ट्रासह गुजरात व मध्यप्रदेशात हा काढा खूप लोकप्रिय झालेला आहे. तर विशेष बाब म्हणजे बांगलादेश व कतार या दोन देशांमधूनही याला मागणी आल्याची माहिती हाजी मुन्ना इब्राहीम तेली यांनी प्रस्तुत प्रतिनिधींशी बोलतांना केली. अर्थात, भुसावळच्या काढ्याला सध्या तुफान लोकप्रियता लाभल्याचे दिसून येत आहे.

खालील व्हिडीओत पहा मुन्ना तेली यांनी युनानी काढ्याबाबत दिलेली सांगोपांग माहिती.

Exit mobile version