Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

बुलढाणा मॅरेथॉनमध्ये भुसावळ रनर्सचे उमेश घुले प्रथम

भुसावळ – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | बुलढाणा मॅरेथॉनमध्ये भुसावळ रनर्सचे उमेश घुले प्रथम तर प्रियंका मंत्री द्वितीय ठरल्या.

 

ज्ञानगंगा फॉरेस्ट रनर्स, बुलढाणा सायकलिंग क्लब व रनबडीज या संस्थांच्या संयुक्त विद्यमानाने रविवारी बुलढाणा फॉरेस्ट मॅरेथॉन संपन्न झाली. २१ किमी, १०  किमी, ५ किमी व ३  किमी या चार गटात ही स्पर्धा घेण्यात आली. यात  भुसावळ स्पोर्ट्स अँड रनर्स असोसिएशनचे तब्बल ३५ धावपटू सहभागी झाले होते. त्यापैकी उमेश घुले २१ किमीच्या पुरुष गटात प्रथम तर प्रियंका मंत्री २१ किमीच्या महिला गटात द्वितीय ठरल्या. त्यामुळे भुसावळ स्पोर्ट्स अँड रनर्स असोसिएशनच्या शिरपेचात पुन्हा एकदा मानाचा तुरा  रोवला गेला.  रविवारी  बुलढाणा शहरापासून २५ किमी अंतरावर बोथा अभयारण्यात २१ किमीच्या स्पर्धेत सुरुवात झाली. यावेळी स्पर्धेत सुरुवात करण्यासाठी हिरवा झेंडा दाखविण्यासाठी मंचावरील मान्यवरांमध्ये भुसावळ स्पोर्ट्स अँड रनर्स असोसिएशनचे प्रमुख प्रवीण फालक यांना विशेष निमंत्रित करण्यात आले होते. त्यांच्या उपस्थितीमुळे भुसावळच्या धावपटूंमध्ये विशेष उत्साह जाणवला.  देशभरातून तब्बल १५०० हून अधिक धावपटूंनी सहभाग नोंदविल्याचे आयोजकांकडून सांगण्यात आले.

भुसावळ स्पोर्ट्स अँड रनर्स असोसिएशनच्या ३५ पैकी ३ धावपटूंनी ५ किमी गटात, ११ धावपटूंनी १० किमी गटात तर तब्बल २१ धावपटूंनी २१ किमी गटात सहभाग नोंदविला. यापैकी ६ महिलांचा समावेश होता. वैशिष्ट्य म्हणजे यापैकी १० धावपटू प्रथमच  शहराबाहेरील स्पर्धेत सहभागी झाले होते.

 सहभागी धावपटूंची नावे:

५ किमी : संदीप सुरवाडे, प्रदीप माळी, डॉ सुनील वाडीले.

१० किमी: अर्चना चौधरी, माधुरी चौधरी, वर्षा वाडीले, सारंग चौधरी, रमेशसिंग पाटील, सुधाकर सणांसे, इसाक गवळी, अशोक पाटील ,प्रमोद शुक्ला, प्रशांत वंजारी.

२१ किमी:  प्रियंका मंत्री, उमेश घुले, पुनम भंगाळे, प्रिया पाटील, मुकेश चौधरी, संतोष घाडगे ,संजय भदाणे, संतोष मोटवानी ,तरुण बिरिया, प्रदीप सोलंकी ,युवराज सूर्यवंशी, सुरेश सहानी, राजेंद्र ठाकूर, जितेंद्र चौधरी, पंकज कुलकर्णी, अॅड. मोहन देशपांडे, गणसिंग पाटील, प्रवीण वारके, रणजीत खरारे, प्रवीण पाटील.

 

Exit mobile version