Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

भाजपा यावल तालुकाध्यक्षपदी उमेश फेगडे बिनविरोध

WhatsApp Image 2019 12 25 at 6.06.11 PM

यावल, प्रीतीनीधी | भारतीय जनता पक्षाच्या यावल तालुकाध्यक्षपदी माजी नगरसेवक उमेश रेवा फेगडे यांची आज झालेल्या पक्षाच्या बैठकीत सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली आहे.

यावल तालुक्यातील भालोद येथील मनुदेवी मंदीर सभागृहात बुधवार दि. २५ डिसेंबर रोजी दुपारी ३ वाजता झालेल्या तालुका अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या बैठकीत खासदार रक्षा खडसे ,माजी आमदार हरीभाऊ जावळे यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि पक्षाचे निवडणुक निर्णय अधिकारी दिनेश फेगडे यांच्यासह सहाय्यक निवडणुक निर्णय अधिकारी विलास चौधरी यांच्या देखरेख खाली पार पडली. याशिवाय पक्षाचे सुनिल नेवे , भाजपाचे संघटन सराचिटणीस डॉ. विजय धांडे, जिल्हा निवडणुक सहप्रमुख हर्षल गोवीदा पाटील व भाजपा जिल्हा सरचिटणीस यांच्यासह असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते या बैठकीस प्रामुख्याने उपस्थितीत होते. भाजपच्या यावल तालुका अध्यक्षपदी उमेश फेगडे यांची बिनविरोध निवड झाल्यावर त्यांचे पक्षाच्या वतीने स्वागत सत्कार करण्यात आले.

Exit mobile version