Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

माजी जि.प. अध्यक्ष उखर्डू तडवी यांचे निधन


सावदा, ता. रावेर प्रतिनिधी । जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष उखर्डू कासम तडवी यांचे आज निधन झाले असून त्यांच्या पार्थिवावर उद्या अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

कुसुंबा खुर्द येथील मुळ रहिवासी तथा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष उखर्डू कासम तडवी यांचे आज सायंकाळी चार वाजता निधन झाले. उद्या सकाळी नऊ वाजता राहत्या घरून त्यांची अंत्ययात्रा निघणार आहे. त्यांच्या निधनाने परिसरावर शोककळा पसरली आहे.

Exit mobile version