Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

सैन्य दलात निवड झाल्याबद्दल उज्ज्वला मांडवकर यांचा सत्कार (व्हिडीओ)

raver ujjvala

रावेर प्रतिनिधी । सैन्यदलात निवड झालेल्या उज्ज्वला मांडवकर यांचा सत्कार शहरातील माऊली फॉऊडेशन संचलित आदित्य इंग्लिश मेडियम स्कूलच्या वतीने मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला.

रावेर तालुक्यातील अजंदे येथील रहिवासी उज्ज्वला मांडवकर यांची नुकतीच भारतीय सैन्य दलामध्ये प्रशिक्षणासाठी निवड झाली आहे. त्या तालुक्यातून सैन्यात जाणा-या पहिल्या महिला ठरल्या आहे. यामुळे त्यांची निवड झाल्याबद्दल शहरातील माऊली फांऊडेशनच्या वतीने आदित्य इंग्लिश मेडियम स्कूल मध्ये तहसिलदार उषाराणी देवगुणे, संस्थेचे अध्यक्ष डॉ.संदीप पाटील, सचिव डॉ.योगिता पाटील यांनी सत्कार केला. यावेळी नगराध्यक्ष दारा मोहोम्मद, माजी नगराध्यक्ष पदमाकर महाजन, उर्दू केंद्र प्रमुख कमालुद्दीन शेख, मुख्यध्यापक संजय पाटील, मनीषा सोहणी, पत्रकार दीपक नगरे, गौरागिनी कोळपकर यांच्यासह शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Exit mobile version