Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

आता उदयनराजेंचा निर्णयदेखील पक्का !

udayanraje bhosale

मुंबई प्रतिनिधी । सातारचे खासदार तथा राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते उदयनराजे भोसले हेदेखील भाजपमध्ये सहभागी होणार असल्याचे स्पष्ट झाले असून ते शनिवारी या पक्षात प्रवेश करणार असल्याचे संकेत मिळाले आहेत.

गेल्या अनेक दिवसांपासून उदयनराजे भोसले हे राष्ट्रवादीला रामराम ठोकून भाजपमध्ये सहभागी होणार असल्याची चर्चा होती. तथापि, त्यांनी आजवर याबाबत कोणतेही भाष्य केले नाही. दरम्यान, गुरूवारी अनेक हालचाली झाल्या. यात प्रामुख्याने उदयनराजे यांची भेट शरद पवार आणि धनंजय मुंडे यांनी घेतली. यामुळे त्यांची नाराजी कमी झाल्याची राजकीय वर्तुळात चर्चा होती. तथापि, सायंकाळी त्यांनी आपल्या समर्थकांची बैठक घेतल्यानंतर ते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. सूत्रांच्या माहितीनुसार ते शनिवार दिनांक १४ रोजी भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.

Exit mobile version