Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

उध्दव ठाकरे हे तर असरानी ! : शेलारांनी उडविली खिल्ली

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | भाजप नेते आशीष शेलार यांनी माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची शेलक्या शब्दांमध्ये खिल्ली उडविली आहे.

उध्दव ठाकरे यांनी अलीकडेच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर घणाघाती टीका करतांना त्यांना मोगँबो म्हटले होते. त्यांचे हे वाक्य मोठ्या प्रमाणात गाजले होते. यावरून सोशल मीडियात प्रचंड प्रमाणात मते व्यक्त करण्यात आली होती. आता ज्येष्ठ भाजप नेते आ. आशिीष शेलार यांनी उध्दव ठाकरे यांच्या टिकेला प्रत्युत्तर दिले आहे.

या संदर्भात आज आशीष शेलार म्हणालेत की, केंद्रीय गृहमंत्र्यांवर अशा पद्धतीने टीका होत असेल तर आम्हीही मर्यादा पाळणार नाहीत. उद्धव ठाकरे तुम्हीसुद्धा हिंदी चित्रपटातील असरानीसारखे झाला आहात. तुम्ही शोले चित्रपटातल्या असरानीसारखे आहात, अशी खोचक टीका आशिष शेलार यांनी केली. दरम्यान, याप्रसंगी त्यांनी ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांच्यावर देखील घणाघाती टिकास्त्र सोडले.

Exit mobile version