Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

उध्दव ठाकरे हे सामान्यांचे असामान्य मुख्यमंत्री-ना. गुलाबराव पाटील ( व्हिडीओ )

जळगाव प्रतिनिधी । राज्याचे मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे हे सामान्यांचे असामान्य मुख्यमंत्री असून त्यांच्या नेतृत्वात राज्य चौफेर प्रगती करत असल्याचे प्रतिपादन राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी केले आहे.

आज मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून ना. पाटील यांनी व्हिडीओ संदेशातून शुभेच्छापर मनोगत व्हिडीओच्या माध्यमातून व्यक्त केले आहे. या संदेशात ना. गुलाबराव पाटील यांनी म्हटले आहे की, उध्दवजी ठाकरे यांचा वाढदिवस हा सर्व शिवसैनिकांसाठी खूप मोठी पर्वणी असते. तथापि, यंदा कोविडचा संसर्ग सुरू असल्याने याच्या प्रतिकारासाठी जे-जे काही करता येईल ते करण्याचा आम्हा शिवसैनिकांचा संकल्प आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी हिंदुत्वाचे व विकासाचे पाहिलेले स्वप्न आज पूर्ण होत असतांनाचे पाहून आम्हाला सर्वांना आनंद होत आहे. ते सामान्यांचे असामान्य नेते असून कुटुंब प्रमुखासारखी त्यांनी भूमिका असल्याचेही त्यांनी आवर्जून नमूद केले.

दरम्यान, उध्दवजी ठाकरे यांच्यासोबतच्या ऋणानुबंधाबाबत आठवणी ताज्या करत ना. गुलाबराव पाटील म्हणाले की, १९९५ साली पाळधी येथे साहेबांची सभा झाली होती. आपण ९९ साली पहिल्यांदा आमदार बनल्यानंतर उध्दवजी हे शिवसेनेत सक्रीय झाले होते. शिवसेनेने नेहमीच सर्वसामान्य शिवसैनिकाला खूप काही दिले आहे. याचमुळे आपल्या सारखा पान ठेला चालवणारा कॅबिनेट मंत्री झालेला आहे. राज्याच्या मुख्यमंत्रीपदाचा कार्यभार त्यांनी अतिशय समर्थपणे सांभाळला आहे. आज देशातील पहिल्या पाच मुख्यमंत्र्यांमध्ये त्यांचा समावेश करण्यात आला असून ते पहिल्या क्रमांकावर येतील असा आशावाद व्यक्त करत त्यांनी मुख्यमंत्र्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

खालील व्हिडीओत पहा ना. गुलाबराव पाटील यांनी दिलेला शुभेच्छापर संदेश.

Exit mobile version