Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

उद्धव ठाकरेंच्या शपथविधी सुरक्षतेबाबत न्यायालयाला चिंता

 

udhav

 

मुंबई (वृत्तसंस्था) शिवतीर्थावर उद्या होणाऱ्या कार्यक्रमाबद्दल आम्हाला काही म्हणायचे नाही. आमची प्रार्थान एवढीच असेल की उद्या काही अप्रिय घटना घडू नये, अशा शब्दात मुंबई उच्च न्यायालयाने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उद्या होणाऱ्या शपथविधीच्या सुरक्षतेबाबत चिंता व्यक्त केली आहे.

 

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या शिवतीर्थावर उद्या होणाऱ्या शपथविधीबाबत वीकम ट्रस्ट या स्वयंसेवी संस्थेने कोर्टात एक याचिका दाखल केली होती. त्यावर कोर्टाने ही चिंता व्यक्त केली. सार्वजिनक मैदानांवर अशा प्रकारच्या कार्यक्रमांचा पायंडा पडू नये. नाही तर जो तो उठेल आणि अशाप्रकारच्या कार्यक्रमांसाठी सार्वजनिक मैदानांचा वापर करेल, असं सांगत कोर्टाने सुरक्षेबाबतची चिंताही व्यक्त केली. न्यायापूर्ती एस. सी. धर्माधिकारी आणि न्यायामूर्ती आर. आय. छागला यांच्या खंडपीठाने ही चिंता व्यक्त केली.

Exit mobile version