Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

मला मंत्रिमंडळात घेण्याबाबतचा निर्णय उद्धव ठाकरे घेतील : अजित पवार

Ajit Pawar

मुंबई (वृत्तसंस्था) यापूर्वीही राष्ट्रवादीत होतो आणि यापुढेही पक्षातच राहील. राष्ट्रवादीने मला पक्षातून काढलेले नाही. मी राष्ट्रवादीचाच आहे. यासोबतच मला मंत्रिमंडळात घेण्याबाबतचा निर्णय भावी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेतील असेही अजित पवार यांनी सांगितले.

 

अजित पवारांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, आपण यापूर्वीही राष्ट्रवादीत होतो आणि यापुढेही पक्षातच राहील. राष्ट्रवादीने मला पक्षातून काढलेले नाही. मी राष्ट्रवादीचाच आहे. यासोबतच त्यांना मंत्रिमंडळात स्थान मिळणार की नाही याचा निर्णय आता भावी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेतील असेही अजित पवार यांनी सांगितले. दरम्यान, नवाब मलिक यांनी देखील शेवटी, अजित दादांनी आपली चूक मान्य केली. हा एक कौटुंबिक मुद्दा असून पवार साहेबांनी त्यांना माफ केले असल्याचे माध्यमांना सांगितले.

Exit mobile version