Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

उध्दव ठाकरे सर्वात लोकप्रिय मुख्यमंत्री : सर्वेक्षणाचा निष्कर्ष

मुंबई प्रतिनिधी | राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या स्थैर्याबाबत संशयकल्लोळ निर्माण झाला असतांना उध्दव ठाकरे हे सर्वाधीक लोकप्रिय मुख्यमंत्री असल्याचे प्रश्‍नम या संस्थेने केलेल्या सर्वेक्षणातून दिसून आले आहे.

प्रश्नम या संस्थेने देशातील १३ राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या कामगिरीबाबत मतदारांकडे सर्वेक्षण केलेे. भारताच्या वेगवेगळ्या राज्यांमध्ये ख्यमंत्र्यांबाबत घेतलेल्या सर्वेचे रेटिंग जाहीर केले आहे. पहिल्या फेरीत १३ ज्यामध्ये बिहार, गोवा, गुजरात, हरियाणा, झारखंड, कर्नाटक, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, पंजाब, राजस्थान, तेलंगणा, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड अशी जवळपास ६७ टक्के लोकसंख्या असणारी राज्ये आहेत. त्यामध्ये उद्धव ठाकरे यांची मुख्यमंत्री म्हणून कामगिरी चांगली आहे आणि आम्ही पुन्हा त्यांना मतदान करू असं मत सर्वेक्षणात सहभागी झालेल्या ४९ टक्के मतदारांनी नोंदवलं आहे. देशातील मुख्यमंत्र्यांच्या सर्वेक्षणात १३ राज्यांमधील सुमारे १७,५०० मतदारांना याबाबत आपली मतं विचारण्यात आली आहेत. यात उध्दव ठाकरे हे सर्वाधीक लोकप्रिय मुख्यमंत्री ठरले आहेत.

या सर्वेक्षणात तब्बल ४९ टक्के असा विश्वास आहे की मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चांगली कामगिरी केली आहे आणि ते त्यांना पुन्हा निवडून देतील. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान ४४ टक्के मतांनी दुसर्या क्रमांकावर आहेत. तिसर्‍या क्रमांकावर राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत आहेत. त्यांना ४० टक्के इतकी पसंती मिळाली आहे.

Exit mobile version