Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

उद्धव ठाकरे यांनी घेतली छत्रपती शाहू महाराजांची भेट; कोल्हापूरातून काँग्रेसचे आहे उमेदवार

कोल्हापूर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा‍ | शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज २१ मार्च रोजी कोल्हापूरचे राजे छत्रपती शाहू महाराज यांची भेट घेतली आहे. त्यांनी कोल्हापूरच्या न्यू पॅलेसमध्ये महाराजांची भेट घेतली. महाविकास आघाडीतर्फे छत्रपती शाहू महाराजांना काँगेस पक्षाकडून लोकसभेसाठी कोल्हापूर मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. फक्त औपचारिक घोषणा बाकी आहे.

यावेळी उद्धव ठाकरे माध्यमांशी बोलताना म्हणाले की, कोल्हापुरातून शाहू महाराजांची उमेदवारी महाविकास आघाडीतून निश्चित झाली आहे. शाहू महाराजांना शिवसैनिक ताकदीने विजयी करतील कारण हा आमच्या अस्मितेचा विषय आहे. शिवसेनाप्रमुखांनंतर १९९७ नंतर प्रथमच मी याठिकाणी आलो आहे. ठाकरे कुटुंब आणि छत्रपती घराण्याचे ऋणानुबंध माझ्या आजोबांपासून आहेत. मला आनंद आहे की, ते ऋणानुबंध या पिढीतही आणि पुढील पिढीतही कायम राहतील. मी त्यांच्या भेटीला आत्ताच आलो पण महाराजांच्या प्रचाराला आणि विजयी सभेला सुद्धा येणार आहे, या लढाईत लढत असून त्यात यश मिळण्यासाठी मी आज शाहू महाराजांचे आशीर्वाद देखील घेतले आहे.

Exit mobile version