Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

शरद पवारांच्या भेटीसाठी उद्धव ठाकरे सिल्वर ओककडे निघाले

sharad pawar and uddhav thackeray

 

मुंबई (वृत्तसंस्था) शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि आमदार आदित्य ठाकरे हे दोघं जण शरद पवारांच्या भेटीसाठी ‘मातोश्री’हून सिल्वर ओककडे रवाना झाले आहेत.

 

सध्याची राजकीय परिस्थिती पाहता कोणत्याही पक्षाने कोणासोबत जावे हे एवढे सहज सोपे राहिलेले नाही. परंतू शिवसेना,राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस एकत्र आल्या शिवाय सक्षम सरकार बनणे अवघड आहे. आयच पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि आमदार आदित्य ठाकरे हे दोघं जण शरद पवारांच्या भेटीसाठी ‘मातोश्री’हून सिल्वर ओककडे निघाले आहेत. या बैठकीत सत्तास्थापनेसह किमान समान कार्यक्रमावर चर्चा होणार असल्याचे कळते. तसेच सत्तेचे वाटप कसे असेल? त्याच पद्धतीने कॉंग्रेसला थेट सत्तेत सहभागी करण्याबाबतही चर्चा होणार असल्याचे कळते.

Exit mobile version