Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

‘फ्रेंडस ऑफ बीजेपी’च्या उत्तर महाराष्ट्राचे संयोजकपदी उदय भालेराव

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | भाजपचेे जेष्ठ कार्यकर्ते, माजी नगरसेवक उदय भालेराव यांची नुकतीच भारतीय जनता पार्टी च्या फ्रेंड्स ऑफ बीजेपीच्या  उत्तर महाराष्ट्राचे संयोजक पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.

 

महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता पार्टी चे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही नियुक्ती केली आहे. ‘फ्रेंड्स ऑफ बीजेपी’चे महाराष्ट्र प्रदेश चे संयोजक सतीश निकम तसेच ‘आय टी सेल’चे प्रमुख आषिश पावसकर यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातील सर्व विभागात ‘फ्रेंड्स ऑफ बीजेपी’च्या संयोजकांच्या नियुक्त्या प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी केल्या आहेत.

 

उत्तर महाराष्ट्रातील आठ लोकसभा मतदारसंघात ‘फ्रेंड्स ऑफ बीजेपी’चे संयोजक नियुक्त करण्यात आले असून या सर्वांच्या सहयोगातून भारतीय जनता पार्टी चे थेट कार्यकर्ते नसलेल्या पण विचारधारा मान्य असलेल्या तसेच पंतप्रधान श्री नरेंद्र जी मोदी यांच्यावर प्रेम करणार्‍या मंडळींना भाजपाशी जोडण्याचे काम ‘फ्रेंड्स ऑफ बीजेपी’च्या माध्यमातून उत्तर महाराष्ट्रातील प्रत्येक लोकसभा मतदारसंघात करण्यात येणार आहे.

 

उदय भालेराव यांच्या या नियुक्ती बद्दल ग्रामविकास मंत्री गिरीश  महाजन,प्रदेश सरचिटणीस विजय चौधरी तसेच विभागीय संघटन मंत्री रवी अनासपुरे, जिल्हा अध्यक्ष ह भ प  ज्ञानेश्वर जळकेकर महाराज व अमोल जावळे, महानगर जिल्हाध्यक्ष अध्यक्षा सौ उज्वलाताई बेंडाळे, खासदार उन्मेष पाटील, श्रीमती रक्षाताई खडसे, आमदार राजूमामा भोळे, आमदार संजय सावकारे व आमदार मंगेश दादा चव्हाण यांनी अभिनंदन केले आहे.

Exit mobile version