Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

उभ्या ट्रकमधुन तीन लाखांचा मुद्देमाल लंपास; यावल-चोपडा रोडवरील घटना

chori

यावल प्रतिनिधी । यावल-चोपडा रस्त्यावरील अक्षदा ढाब्यावर ३० रोजी मध्यरात्रीच्या सुमारास उभ्या असलेल्या ट्रकमधुन विको टर्मरीक कंपनीचे सुमारे 3 लाख १२ हजार ४५३ रुपयाचे २२ कार्टून चोरीस गेले. याबाबत ट्रकमालकाच्या फिर्यादीवरून यावल पोलीस ठाण्यात अज्ञात चोरटयाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला.

यावल-चोपडा रस्त्यावर सुमारे शहरापासून 1 कि.मी. अंतरावर असलल्या अक्षदा ढाब्यावर मध्यरात्रीच्या सुमारास मुक्कामास असलेल्या ट्रक (क्र.एमएच ३२ क्यु-४०३३) या ट्रकची ताडपत्री अज्ञात चोरटयांनी कापून त्यातील विको टर्मरीक कंपनिचे २२ कार्टून चोरून नेले असल्याची फिर्याद ट्रकमालक जयकुमार महादेवराव घोडीले (वय-५६) रा. टेकानाका नागपुर यांनी येथील पोलीस ठाण्‍यात दिल्यावरून अज्ञात चोरटयां विरूध्द गुन्हा दाखल केला करण्यात आला. पुढील तपास पो.नि.अरूण धनवडे यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार सुनिता कोळपकर, हे.कॉ. संजय तायडे या घटनेचा पुढील तपास करीत आहे. एखाद्या धाब्यावर विश्रांतीसाठी मुक्कामास ढाब्यावर थांबलेला ट्रकमधील लाखो रुपयांचे साहीत्य चोरीस जाण्याची ही कदाचीत पहीलीच घटना असावी असे बोलले जात आहे.

Exit mobile version