यूएईचे अध्यक्ष शेख खलिफा यांचे निधन

यूएई वृत्तसंस्था | यूएईचे अध्यक्ष शेख खलिफा यांचे आज वयाच्या ७४ व्या वर्षी निधन झाले असून यांच्या मृत्यूनंतर यूएईमध्ये चार दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आला आहे.

यूएईच्या मिनिस्ट्री ऑफ प्रेसिडेंन्शिअर अफेअर्सने आज यूएई अर्थातच संयुक्त अरब अमिरातीचे अध्यक्ष शेख खलिफा बिन झाएद अल नाहयान यांच्या मृत्यूची बातमी जाहीर करण्यात आली. त्याचबरोबर त्यांच्या निधनानंतर यूएईमध्ये चार दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. या काळात सर्व सरकारी कार्यालयावरचे ध्वज अर्ध्यावर ठेवण्यात येणार असून सर्व कार्यालयं आणि खासगी कंपन्याही बंद ठेवण्यात येणार आहेत. जगातला सर्वात उंच टॉवर असलेल्या दुबईतील बूर्ज खलिफाचे नाव हे शेख खलिफा यांच्या नावावरुन ठेवण्यात आलं आहे.

शेख खलिफा यांना काही वर्षांपूर्वी त्यांना स्ट्रोकचा गंभीर आजार जडला. गेल्या काही वर्षांपासून आजारपणाशी झुंजत होते. त्यांचे आज निधन झाले. त्यांच्या मृत्यूनंतर आता अबुधाबीचे क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन झाएद हे यांच्याकडे यूएईची सूत्र जाण्याची शक्यता असून अद्याप यासंबंधी कोणतीही घोषणा करण्यात आली नाही.

Protected Content