Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

जिल्हा परिषदेचे दोन सदस्य अपात्र

जळगाव प्रतिनिधी । विहीत वेळेत जात प्रमाणपत्र सादर न केल्याने दोन जिल्हा परिषद सदस्यांना अपात्र ठरवण्यात आले आहे.

जिल्हा परिषदेच्या वाघोदा-विवरा गटाचे सदस्य आत्माराम सुपडू कोळी व हतनूर- तळवेल गटातील सरला अनिल कोळी या दोघांना अपात्र ठरवणारे आदेश जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे यांनी असून याबाबतची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयातील विधी अधिकारी अ‍ॅड. हारुल देवरे यांनी दिली.
वाघोदा-विवरा गटात अनुसूचित जमाती प्रवर्गातून आत्माराम सुपडू कोळी यांनी सहा महिन्याच्या आत जात वैधता प्रमाणपत्र सादर केले नसल्याची तक्रार गोमती बारेला यांनी केली होती. २१ जून २०१९ पर्यंत आत्माराम कोळी यांनी प्रमाणपत्र सादर न केल्याने जिल्हाधिकारी डॉ. ढाकणे यांनी महाराष्ट्र जिल्हा परिषद, पंचायत समिती अधिनियम १९६१ कलम १२ अ नुसार अपात्र ठरवले आहे.तसेच हतनूर तळवेल गटातून अनुसूचित स्त्री प्रवर्गातून विजयी झालेल्या सरला अनिल कोळी यांनी जात प्रमाणपत्र सादर केले नसल्याने त्यांनाही अपात्र ठरवण्यात आल्याची माहिती अ‍ॅड. देवरे यांनी दिली.

Exit mobile version