Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

नशीराबाद टोलनाक्याजवळ मालवाहू वाहनाच्या धडकेत दोन तरुण जखमी

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील नशीराबाद टोलनाक्याजवळ मालवाहू वाहनाच्या धडकेत दोन तरुण जखमी झाल्याची घटना घडली होती. या घटनेप्रकरणी वाहनचालकांविरोधात नशीराबाद पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

नशिराबाद पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, जळगाव शहरातील रामेश्वर कॉलनी येथील यश अरुण लोखंडे हा त्याचा मिऋ राकेश जाधव याच्यासोबत १२ मार्च रोजी नशीराबाद टोलनाका परिसरात गेला होता.  यादरम्यान (एम.एच. १९ डी.के. ७०७३) या मालवाहू वाहनाने यश व त्याचा मित्र राकेश यास समोरुन जोरदार धडक दिली. या अपघातात यश व राकेश या दोघांना दुखापत झाली आहे. उपचार घेतल्यानंतर याप्रकरणी यश याने दिलेल्या तक्रारीवरुन सोमवारी २१ मार्च रेाजी (एमएच १९ डी.के. ७०७३) या मालवाहू वाहनावरील अनोळखी चालकांविरोधात नशीराबाद पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल राजेंद्र ठाकरे करीत आहेत.

Exit mobile version