Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

पेट्रोलचा भडका झाल्याने दोन तरूण भाजले

भुसावळ – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । एका दुचाकीतून दुसऱ्या दुचाकीत पेट्रोल टाकतांना भडका झाल्याने लागलेल्या आगीत दोन तरूण गंभीररित्या भाजले गेले. दोघांना जिल्हा शासकीय रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.

 

सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, भुसावळ तालुक्यातील वरणगाव येथील रहिवाशी शंकर हरी पवार (वय-१८) व  दीपक किशोर भील (वय-१८) हे दोघे मित्र आहेत. सोमवारी २ मे रोजी रात्री दोघे दुचाकी घेवून बाहेर गेले होते. दरम्यान यातील एकाच्या दुचाकीतील पेट्रोल संपल्याने दुसऱ्या मित्रांच्या दुचाकीतील पेट्रोल काढून दुचाकीत पेट्रोल भरत होते. त्यावेळी पेट्रोलचा अचानक भडका झाल्याने दोघे तरूण गंभीररित्या भाजले गेले. दोघांना तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले  आहे. याबाबत वैद्यकीय अधिकारी यांनी गंभीररित्या भाजले गेल्या दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. याबाबत पोलीसात अद्याप कुठलीही नोंद करण्यात आलेली नाही.

 

Exit mobile version