Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

कल्याणमध्ये भरधाव जीपने दोन तरूणींना उडवले

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | पुण्यातील पोर्शे कार अपघात व त्यानंतर नागपूरमधील घटनेनंतर आता कल्याणमध्ये भरधाव जीपने दोन तरुणींना उडवले आहे. कल्याणच्या रिंग रोडवर भरधाव वेगाने येणाऱ्या जीपने एका दुचाकीला धडक दिली. कल्याणमधील हिट अँड रनच्या केसमध्ये भरधाव जीपने दुचाकीवरून जात असलेल्या दोन तरुणींना धडक दिली. दुचाकीला धडक दिल्यानंतर जीप चालक तेथून पसार झाला. या घटनेत दोन्ही तरुणी गंभीर जखमी झाल्या असून त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

सेजल भानुशाली व समीक्षा भानुशाली असे या अपघातात जखमी झालेल्या तरुणींची नावे आहेत. दुचाकीला जीपने उडवल्यानंतर अपघातस्थळी बघ्यांची गर्दी झाली होती. कल्याणमधील रिंग रोडवर हा अपघात झाला. या अपघातानंतर गाडी घेऊन चालक पसार झाला. या अपघातात दुचाकीस्वार दोन्ही तरुणी गंभीर जखमी झाल्या आहेत. जखमी झालेल्या दोन्ही तरुणी इंजिनीअरिंगच्या विद्यार्थिनी आहेत. घरी परतत असताना ही घटना घडली. या अपघात प्रकरणी खडकपाडा पोलिसांनी जीप चालकाचा शोध सुरु केला आहे.

कल्याण पश्चिमेकडील रिंग रोड येथील गांधारी पूलाजवळ एका भरधाव जीप चालकाने दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीवरुन जाणाऱ्या दोन तरुण विद्यार्थिनी जखमी झाल्या. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. रिंग रोडचे काम काही ठिकाणी अर्धवट अवस्थेत आहेत. त्यात काही स्टंटबाज धूम स्टाईल वाहनचालकांमुळे या रिंग रोडवर अपघातांचा प्रमाण वाढले आहे.

Exit mobile version