Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

खळबळजनक : केऱ्हाळा खुर्द येथे दोन महिलांचा खून

keryada news

 

रावेर (प्रतिनिधी) तालुक्यातील केऱ्हाळा खुर्द येथे दोन महिलांचा खेडी शिवारातील एका शेतात निर्घृण खून झाल्याची घटना आज दुपारी उघडकीस आली आहे. या घटनेमुळे गावासह संपूर्ण जिल्ह्यात प्रचंड खळबळ उडाली आहे.

 

या संदर्भात अधिक असे की, तालुक्यातील केऱ्हाळा खुर्द परिसरातील खेडी शिवारातील एका कापसाच्या शेतात आज दुपारी १२ वाजेच्या सुमारास दोन अज्ञात महिलांचे मृतदेह आढळून आल्यामुळे प्रचंड खळबळ उडाली होती. त्यानंतर घटनास्थळी पोलीस दाखल झाले. पोलिसांनी दोघं महिलांची अनुक्रमे शालूबाई गौतम तडवी आणि नशीब तडवी (दोघं रा. केऱ्हाळा खुर्द) अशी ओळख पटवली. दोघं महिलांच्या डोक्यावर व छातीवर तीक्ष्ण हत्याराने वार केलेले आहेत. दरम्यान, खून कुणी आणि कोणत्या कारणासाठी केला? हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही. परंतू या घटनेमुळे परिसरात दहशतीचे वातावरण पसरलेले आहे. तर घटनास्थळी बघ्यांनी एकच गर्दी केली होती. वरिष्ठ पोलीस अधिकारी देखील केऱ्हाळा खुर्द येथे पोहचले आहेत.

Exit mobile version