दुचाकी चोर जिल्हापेठ पोलीसांच्या ताब्यात

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील नवीन बसस्थानकाजवळील हॉटेल सुयोग समोरून तरूणाची दुचाकी लांबविणाऱ्या संशयिताला दुचाकीसह जिल्हापेठ पोलीसांनी अटक केली आहे.  याबाबत जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

विकास उर्फ विक्की दारासिंग जाधव (वय-२१) रा. वेल्हाळा, ता. भुसावळ जि.जळगाव असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे.

 

जिल्हापेठ पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, भुषण सुनिल राऊत (वय-२६) रा. पिंप्राळा चिंचपूरा जळगाव हा तरूण आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला असून रिपेंअरींगचे कामे करून उदरनिर्वाह करतो. २४ जून रोजी दुपारी ३.३० वाजेच्या सुमारास भुषण हा त्याची दुचाकी (एमएच १९ सीबी ९०५९) ने नवीन बसस्थानक जवळील हॉटेल सुयोग जवळ पार्क करून लावली होती. चोरट्यांनी पार्किंगला लावलेली दुचाकी चोरून नेली होती. याबाबत जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.  पुढील तपास पोलीस नाईक जुबेर तडवी करीत आहे.

 

बुधवार १३ जुलै रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास जिल्हापेठ पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक गणेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाल पोलीस नाईक जुबेर तडवी आणि पोलीस कॉन्स्टेबल अमित मराठे हे साध्यावेशात जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात गस्तीवर असतांना एक जण संशयास्पद हालचाली करतांना दिसून आला. त्यानुसार पोलीसांनी त्याचा पाठलाग करून स्वातंत्र्य चौकात पकडले. त्याच्या जवळील दुचाकी ही दाखल गुन्ह्यातील असल्याचे निष्पन्न झाले. संशयित विकास उर्फ विक्की दारासिंग जाधव (वय-२१) रा. वेल्हाळा, ता. भुसावळ जि.जळगाव असे याला अटक केली असून त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे. त्याच्या विरोधात जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Protected Content