Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

सराईत दुचाकी चोराला अटक; १२ दुचाकी जप्त

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । चाळीसगाव शहरातून दुचाकी चोरीच्या गुन्ह्यातील संशयित आरोपील जळगाव रेल्वे स्थानकातून अटक करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आहे. त्याच्याकडून चोरीच्या १२ दुचाकी हस्तगत करण्यात आले आहे.

 

चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात दुचाकी चोरीच्या दाखल गुन्ह्यातील संशयित आरोपी हा जळगाव शहरातील रेल्वे स्थानक परिसरात आल्याची गोपनिय माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांना मिळाली. त्यानुसार पथकातील पोलीस उपनिरीक्षक अमोल देवढे, पोकॉ. विजयसिंग पाटील, अनिल देशमुख, सुधाकर आंभोरे, पो.ना. राहूल पाटील, किरण चौधरी, प्रितम पाटील, प्रमोद लाडवंजारी, ईश्वर पाटील आणि चालक प्रमोद ठाकूर यांनी गुरूवार ७ जुलै रोजी दुपारी सापळा रचून संशयित आरोपी विकास उर्फ विक्की शिवाजी महाले याला अटक केली. त्याच्याकडून चोरीच्या एकुण २ लाख २२ हजार रूपये किंमतीच्या  १२ दुचाकी हस्तगत करण्यात आले आहे. त्याच्याकडून आजून काही दुचाकी चोरीचे गुन्हे उडघकीला येण्याची शक्यता आहे. पुढील कारवाईसाठी चाळीसगाव शहर पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

Exit mobile version