Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

शिवाजी नगरात घरासमोरून दुचाकी लंपास

जळगाव प्रतिनिधी । शहरातील शिवाजी नगरात रहिवाश्यांच्या घरासमोर लावलेली दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याचा प्रकार घडला असून याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

शहरातील शिवाजीनगर परिसरातील रहिवासी राहुल रघुनंदन बुडूखले (वय-३४) या तरुणाने २४ ऑगस्ट रेाजी कामावरुन परतल्यानंतर दुचाकी (एमएच.१९ डीसी.५७१८) नेहमी प्रमाणे घराबाहेर उभी केली होती.

सकाळी कामावर निघतांना बघीतले असता दुचाकी चेारीला गेल्याचे आढळून आले. शोधूनही दुचाकी सापडत नाही म्हणुन शहर पोलीस ठाण्यात या प्रकरणी तक्रार दिल्यावरुन अज्ञात चोरट्या विरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

Exit mobile version