Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

चाळीसगावात दुचाकी लंपास ; गुन्हा दाखल

चाळीसगाव प्रतिनिधी । शहरातील गजाननवाडी येथे घराच्या कंपाऊंडबाहेर दुचाकी पार्क केली असून अज्ञात चोरट्यांनी दुचाकी लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी चाळीसगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत वृत्त असे की, ईश्वर रामभाव चौधरी (वय- ४९ रा. गजान्नवाडी ता. चाळीसगाव) हे वरील ठिकाणी आपल्या परिवारासह वास्तव्यास असून मोलमजुरी करून ते कुटुंबाचे उदरनिर्वाह करीत असतात. दरम्यान ११ जूलै रोजी ईश्वर यांनी रात्री २ वा. ते ४ वाजताच्या सुमारास दुचाकी (क्र. एम.एच.१९ सीएच- ६७८७) घराच्या कंपाऊंड बाहेर पार्क केली व झोपण्यासाठी निघून गेला. सकाळी उठल्यावर कामावर जाण्यासाठी ईश्वर यांनी मुळ जागी दुचाकी पाहाली असता. त्याला दुचाकी दिसून आली नाही. त्यावर त्यांनी परिसरात व नातेवाईकांकडे आजपावेतो शोधाशोध केली परंतु मिळून न आल्याने २०,००० हजार रुपये किंमतीची होंडा कंपनी व  लाल रंगाची मोटारसायकल अज्ञात इसमाने चोरून नेल्याचे स्पष्ट झाल्याने चाळीसगाव शहर पोलिस स्थानकात अज्ञात चोरट्याविरुद्ध भादवी कलम-३७९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आले आहे. पोलिस निरीक्षक विजयकुमार ठाकूरवाड यांच्या निर्देशानुसार पुढील तपास अभिमान पाटील हे करीत आहेत.

Exit mobile version