Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

रिक्षाच्या धडकेत दुचाकीस्वार जखमी

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । आकाशवाणी चौकात भरधाव रिक्षाच्या धडकेत दुचाकीस्वार जखमी झाल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी रामानंदनगर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

याबाबत अधिक माहिती अशी की, शहरातील पिंप्राळा परिसरातील ओमशांतीनगर येथे जगदीश सुकलाल बाविस्कर वय ६४ हे वास्तव्यास आहेत. ते बुधवार, ८ जून रोजी शहरातील आकाशवाणी चौकातून दुचाकीने जात असतांना लाली पानसेंटरसमोर एम.एच.१९ व्ही ७१५७ या क्रमांकांच्या रिक्षाने जगदीश बाविस्कर यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत दुचाकीवरील जगदीश बाविस्कर यांच्या मांडीच्या हाडाला दुखापत होवून ते जखमी झाले. याप्रकरणी त्यांचे नातेवाईक सुनील शामकांत पाटील रा. निवृत्तीनगर यांनी गुरुवारी रामानंदनगर पोलिसात दिलेल्या तक्रारीवरुन (एमएच १९ व्ही ७१५७) या क्रमाकांच्या रिक्षावरील चालकाविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार संजय चौधरी हे करीत आहेत.

Exit mobile version