Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

सिंधी कॉलनीत रिक्षाच्या धडकेत दुचाकीस्वार जखमी

जळगाव प्रतिनिधी । जळगाव शहरातील सिंधी कॉलनी परिसरात भरधाव रिक्षाने जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार जखमी झाल्याची घटना घडली. याप्रकरणी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात अज्ञात रिक्षाचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सतीश प्रल्हाद नेमाडे (वय-४९) रा. पराग अपार्टमेंट रिंग रोड, हरेश्वर नगर, जळगाव हे आपल्या कुटुंबीयांसह वास्तव्याला आहे. नाश्ताची गाडी लावून आपला उदरनिर्वाह करतात. यासाठी त्यांच्याकडे (एमएच १९ बीएस ५०५५) क्रमांकाची दुचाकी आहे. या दुचाकीवरून नाश्ता सेंटरवर लागणाऱ्या मालाची ने आण करतात. सोमवारी २७ डिसेंबर रोजी सायंकाळी ६.३० ते ७ वाजेच्या दरम्यान सतीश नेमाडे हे दुचाकीवरून सिंधी कॉलनीकडून आकाशवाणी चौकाकडे येत असताना समोरून चुकीच्या मार्गाने येणारी रिक्षा (एमएच १९ जे ७३३९) वरील रिक्षाचालकाने जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार सतीश नेमाडे हे खाली पडले. ते किरकोळ जखमी झाले. परंतू यात दुचाकीचे मोठे नुकसान झाले आहे. अपघात घडल्यानंतर रिक्षाचालक रिक्षा घेऊन पसार झाला होता. जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार घेऊन सतीश नेमाडे यांनी मंगळवार २८ डिसेंबर रोजी दुपारी ४ वाजता जिल्हापेठ पोलिस ठाण्यात रिक्षा चालकाविरोधात तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून  (एमएच १९ जे ७३३९) वरील रिक्षाचालकांवर जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस नाईक पल्लवी मोरे करीत आहे.

 

Exit mobile version