Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

पिकअप व्हॅनच्या धडकेत दुचाकीस्वार जखमी

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करुन भरधाव वेगाने जाणार्‍या बोलेरो पिकअप व्हॅनने दुचाकीला जोरदार धडक दिल्याची घटना दि. १ जून रोजी घडली. याप्रकरणी धडक देणार्‍या वाहनचालकाविरुद्ध नशिराबाद पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जळगाव तालुक्यातील नशिराबाद येथील मोहिब्बुलहक मन्यार (वय-३९) हा तरुण त्याच्या (एमएच १९ डीएक्स ६३८६) क्रमांकाच्या दुचाकीने जात होता. यावेळी मागून भरधाव वेगाने येणार्‍या पिकअप व्हॅनने महामार्गावरील महिंद्रा शो-रुम जवळ दुचाकीस्वाराला जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरु आहे.

याप्रकरणी जखमी मोहिब्बुलहक मन्यार यांच्या तक्रारीवरुन नशिराबाद पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास राजेंद्र ठाकरे हे करीत आहे.

 

Exit mobile version